आम्हा घरी धन । शब्दांचीच रत्ने ।।

असे संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे..

त्यांच्यासारख्या संत आणि  कवी यांनी दर्शवलेल्या वाटेवरून माझ्यासारख्या अनेक मराठी प्रेमी  जनांचा प्रवाह चालला आहे.

त्या वाटेवर मला गवसलेलेले काही..    रसिक वाचकांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही! ..   “जे जे आपणास ठावे ते ते दुसऱ्यास सांगावे  ” असे संत रामदास बोलून गेले आहेत. 

ते समजलेलं, उमजलेलं  या संकेतस्थळाच्या व्यासपीठावर मांडण्याचा हा एक प्रयत्न.  

ज्ञानेश्वरांच्या शब्दात     “तोषोनि   मज द्यावे पसायदान हे ।”  

मी शिक्षणाने वैज्ञानिक, व्यवसायाने संगणकतज्ञ, वृत्तीने साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ती. माझा एक संवेदनाशीलतेचा पंख आणि दुसरा सामाजिक जाणिवेचा. माझ्यातील स्वभावजन्य उर्मी, कौशल्ये आणि कर्तव्ये यांची गुंफण करत मी लिहीत गेले आणि काही सामाजिक कामही माझ्या हातून घडत आहे. साहित्यात समाजाचे प्रतिबिंब पडते, तशी समाजात सामाजिक कार्याबद्दल जागृती निर्माण करण्याची ताकद साहित्यात असते. या ताकदीचा उपयोग आपल्या लेखनात जाणीवपूर्वक करण्याचे प्रयत्न. मी करत असते. त्यामुळे माझा साहित्य प्रवास , सामाजिक कार्य  हे एकमेकात गुंफलेले आहे.  वेगळा विचार करता येत नाही.हे सर्व एकत्रितपणे या संकेतस्थळाच्या मंचावर मांडण्याचा प्रयत्न आहे. 

अमेरिकन मराठी जन मन अधिवेशन पुस्तकानिमित्ताने सुचलेले काही अमेरिकन मराठी सदरात आहे. अमेरिकन जीवनाचे काही कवडसे अपूर्वरंग मध्ये दिसतील. सामाजिक कामाबद्दल आणि संस्थांबद्दलचे तरंग  समाजरंग मध्ये आहेत.  उत्तर अमेरिकेतील भारतीय लोकांच्या  उत्तर आयुष्याचा विचार  उत्तररंग मध्ये आहे. माझे काही मुक्त लेखन मुक्तरंग मध्ये आहे. तुंम्हाला यातील काही आवडले तर प्रतिसाद वाचायला  नक्की आवडेल ! 

माझी काही पुस्तके ग्रंथालीने प्रकाशित केली आहेत आणि ती  बुकगंगा.कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.  

धन्यवाद ! 

विद्या हर्डीकर सप्रे