विद्या हर्डीकर सप्रे
टीप: २०१५ पासून बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात उत्तर रंग ही एक दिवसाची परिषद होत असते. त्याचे बोधवाक्य पुढीलप्रमाणे आहे:
एकमेकांचे धरुनी हात| सुखशांतीची शोधू वाट ।।
चला राहू आनंदात । आयुष्याच्या उत्तररंगात ।।
विद्या हर्डीकर सप्रे
टीप: २०१५ पासून बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात उत्तर रंग ही एक दिवसाची परिषद होत असते. त्याचे बोधवाक्य पुढीलप्रमाणे आहे:
एकमेकांचे धरुनी हात| सुखशांतीची शोधू वाट ।।
चला राहू आनंदात । आयुष्याच्या उत्तररंगात ।।
“आयुष्य हे एक साहसी योगायोगांची मालिका आहे”, डॉ. उदय देवासकर सांगत होते. योगायोगाने भेटलेल्या एका गुजराथी कुटुंबाने बडोद्याहून अमेरिकेत येण्यासाठी केलेली मदत..’नवजात शिशु’ विभागासाठी पत्नी शिरीन देवासकर सह झोकून देऊन झेललेली आव्हाने..एका नवजात अर्भकाची प्रचंड गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया.. अशा अनेक साह्सांब्द्द्ल सांगतानाच उदयने त्यांच्या पुण्यातील साहसी योगायोगाची गमत सांगितली. आणि मग पटकन मिश्कीलपणे म्हणाले, “ हो, आणि आज तुमची ओळख म्हणजे आणखी एक साहसी योगायोग!” ‘युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस’(UCLA) च्या रुग्णालयातील एका ख्यातनाम डॉक्टरची ओळख करून घेण्याचा आमचा ताण त्यांच्या या विधानाने एकदम सैलावला आणि आम्ही सगळेच खळखळून हसलो. आमचे स्नेहाचे धागे सहजपणे जुळले.
बाकी आम्हीही एका साहसी मोहिमेसाठीच त्याना भेटायला गेलो होतो .मोहीम होती पुण्यातील ‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नवजात बालकांवर गुंतागुंतीच्या ऱ्हुद्य शस्त्रक्रिया करण्यासाठी काही निधी जमवण्याची! या मोहिमेचे शिल्पकार होते स्वत: डॉ. उदय देवासकर !
ते सांगत होते,’ “काही वर्षापूर्वी हे “सर्जनशील साहस” आपण करू असं मला स्वप्नातही वाटलं नव्हत,. मी बडोद्याचा. त्यामुळे केवळ ८ दिवस भारतात गेलो तेव्हा पुण्यात जाण्याचं तसं विशेष कारण नव्हत. पण गेलो. तिथे एका जुन्या मित्राकडे चहा घेताना त्याच्या भाचीने सहज म्हणून एक पत्रक हातात दिले. ते होते डॉ. धनंजय केळकरांचे आवाहनपत्र. . वाचून काय वाटले कोण जाणे, पण तडक उठलो आणि पुण्यात बांधकाम चालू असलेल्या या रुग्णालयासमोर जाऊन थांबलो. डॉ. धनंजय केळकर भेटले. डॉ. केळकर यांची दार्शनिकता, तडफ, नवे विचार ऐकून त्यांचे महत्त्व ओळखण्याचा मोकळेपणा, साधेपणा आणि समर्पित वृत्ती सर्वच आवडले आणि आमचे ऋणानुबंध जुळले. मी मुक्काम दोन दिवस वाढवला आणि मग काम करणारे अभियंते,(इंजिनिअर), वास्तुशिल्पी(architect) आणि डॉक्टर या सर्वांबरोबर बैठकी घेऊन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नवजात शिशु विभागाची संकल्पना आणि योजना केली. “.
‘समानी व आकूति: |समाना ऱ्हुदयानि व: ||’ असे धागे जुळलेले. तेव्हा विभागाची केवळ योजना करून उदय देवासकर थांबले नाहीत. तर नंतर त्या विभागप्रमुखाना सपत्निक लॉस अन्जेलीस ला बोलावून स्वत:च्या घरी त्यांची रहाण्याची व्यवस्था करून, त्याना UCLA चे अद्ययावत रुग्णालय दाखवले. त्यानंतरची पुढची काही वर्षे दीनानाथ रुग्णालयाच्या नवजात शिशु विभागासाठी वर्षातून दोन फेऱ्या पुण्यात करून आपला धावपळीचा वेळ डॉ. देवासकर यानी सत्कारणी लावला. या विभागातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण करण्यासाठी UCLA चे कर्मचारी पुण्यास पाठवले. यंत्रसामग्री, मिळवून दिली आणि अक्षरश: जीव ओतून हा विभाग आकाराला आणला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नवजात शिशु तात्काळ सेवा (Neonatal Intensive Care Unit) मध्ये आधुनिक तंत्रे आणि सेवा उपलब्ध करण्याची सोय केली. तिथे अनेक शैक्षणिक परिषदा आयोजित करून हा विभाग पुणे आणि परिसरासाठी नवजात शिशु सेवासाठीचे माहितीकेंद्र व्हावा यासाठी प्रयत्न केले. विविध ठिकाणी दिलेल्या व्याख्यानातून मिळालेले पैसे आणि स्वत:चा अमूल्य वेळ याच्या एकत्रित निधीतून ही सेवा चालू आहे. आपला वेळ आणि तज्ञता देऊन भारतात रुग्णसेवा करणारे अनेक अमेरिकन (त्यात भारतीय अमेरिकनही आले) डॉक्टर आहेत. पण त्यापुढे एक पाउल टाकून प्रत्येक योगायोगाचे साहसात रुपांतर कसे करावे आणि ते साहस यशस्वी करण्यासाठी लागेल ती धावपळ कशी करावी, आपल्या वेगवान आयुष्यातून वेळ कसा द्यावा याचा आदर्श वास्तुपाठ म्हणजे डॉ. उदय देवासकर. ! बाबा आमटे यांच्या शब्दाचा आधार घेऊन सांगायचं, तर देवासकर यांच्या सृजनशील आणि ‘सर्जनशील’ साह्साना अक्षरश: ‘सीमा’ नसतात! अमेरिकतील तज्ञ डॉक्टर भारतात परिषदाना जातात तेव्हा त्यांना पटवून देऊन दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि भारतातील अन्य रुग्णालयांच्या भेटी घडवणे, त्यांची व्याख्याने आयोजित करणे अशा कल्पना डॉ. देवासकराना वेळोवेळी सुचतात आणि त्यांच्या अमलबजावणीसाठी धावपळ करण्याची त्यांची तयारी असते. निधी नसेल तर प्रसंगी स्वत:च्या खिशातून खर्च करतात.
एकदा त्यांच्या पत्नीचा (शिरीन) ‘डॉक्टर ऑफ द ईयर’ असा सन्मान झाला. त्याप्रसंगीच्या भोजन समारंभात शेजारी बसलेल्या डॉक्टर शेर्मनशी गप्पा मारताना त्यांनी भारतात जाऊन गरिबांसाठी ‘कर्रेक्टीव प्लास्टिक सर्जरीज’ शिबीर करण्याची योजना केली आणि आणखी एक साहसी सफर आखली. लॉस एंजेलिस मधील ‘Plastico Foundation’ या संस्थेच्या २० डॉक्टर आणि अन्य सेवकांचा ताफा डॉ. लारी निचर च्या नेतृत्वाखाली पुण्याला रवाना झाला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कर्मचारी, डॉक्टर्स हे त्यात सामील झाले. रुग्णालयाची यंत्रणा ( जागा, शस्त्रक्रिया गृहे, सामग्री, औषधे ई.) डॉ. केळकर यांनी अर्थातच विनामूल्य देऊ केली. जन्मजात व्यंगे, भाजणे यातून निर्माण झालेली गुंतागुंत यामुळे शारीरिक हालचाली आणि शरीर यंत्रणेत दोष निर्माण होतात. हे दोष दूर करण्यासाठी ‘corrective plastic surgery’ चा उपयोग होतो. अशी शस्त्रक्रिया परवडत नाही अशा सुमारे १०० गरीब रुग्णांची पहाणी करून त्यांच्यावर या दोन आठवड्यांच्या शिबिरात मोफत शस्त्रक्रिया केल्या गेल्या. त्या सर्व यशस्वी झाल्या. या रुग्णांचा जाण्या येण्याचा, रहाण्याचा सर्व खर्चही करण्यात आला. डॉ. निचर यांच्या ताफ्याने दीनानाथ रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याना प्रशिक्षण दिले आणि त्यांनी शस्त्रक्रियेनंतरची सर्व सेवा पुरवली. त्यानंतर जगभरात अशा शिबिरांची योजना करता येईल का असा विचार करून UCLA मार्फत एक सेवा यंत्रणा उभारण्याची योजनाही डॉ. देवासकर यांनी केली.
एक शिबीर यशस्वी झाल्यावर डॉ. उदय देवासकर यांनी नव्या साहसाची योजना केली. ते साहस म्हणजे बालकांच्या ऱ्हुद्य शस्त्रक्रियाचे शिबीर. International Children’s Heart Foundation ही अमेरिकेतील संस्था, UCLAचे काही डॉक्टर्स आणि सेवक, व दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांनी एकत्र काम करायचे. डॉ. बिल नोविक ( ICHFचा संस्थापक) या शस्त्रक्रिया तज्ञाने डॉक्टर्स आणि सेवक मिळून २० जणांचा ताफा घेऊन पुण्यात जायचे. पुण्यातील ताफा त्याना मदतीसाठी असेल. दोन आठवड्यात सुमारे २० ते २५ बालकांच्या ऱ्हुदयावरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि पुण्यातील डॉक्टर्स व सेवक यांना प्रशिक्षण. बालकांची शस्त्रक्रियोत्तर देखभाल करून त्याना घरी पाठवण्याचे काम पुण्यातील ताफ्याचे. अशी योजना. जरी या ताफ्याने आपला वेळ आणि तज्ञता मोफत दिली आणि पुण्यातील शस्त्रक्रिया खर्चाची जबाबदारी दीनानाथ रुग्णालयाने उचलली तरी ताफ्याचा जाण्यायेण्याचा, रहाण्याचा खर्च होताच. त्यासाठी आमच्या घरी आमच्या घरी आम्ही एक निधिसंकलन कार्यक्रम केला. गावातले मित्र आणि काही डॉक्टर्स आम्ही बोलावले.
डॉ. देवासकरांनी सर्व योजना समजावून सांगितली आणि आधी यशस्वी झालेल्या plastic surgery शिबिराची छायाचित्रे दाखवली. या शिबिरात भाग घेतल्या एका भारतीय डॉक्टरने स्वत:चे अनुभव सांगितले.
सर्वात शेवटी मी या शिबिराचे दूरगामी महत्व सांगितले आणि आवाहन केले. महाराष्ट्रातील काही अभागी बालकांच्या सुदैवाने आम्हाला यश आले आणि पुरेसा निधी जमा झाला. डॉ. देवासकर यांनी ताफ्याला घेऊन रवाना होण्याचे सर्व संयोजन केले. पुण्याहून डॉ. केळकर आणि त्यांचे दीनानाथ रुग्णालयाचे सर्व सहकारी यांनी सूत्रे सांभाळली. २० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या. अशावेळी शस्त्रक्रियोत्तर काळात बालके दगावण्याचे प्रमाण बरेच असते. पण सुदैवाने १८ बालके जगली आणि या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. अनेक साहसी योगायोगातून, अनेक डॉक्टर्स आणि सेवकांच्या श्रमातून, साकारलेली ती १८ जीवने! अनेक अर्थांनी त्या सृजनशील आणि सर्जनशील साह्साना सीमा नाहीत! विद्या हर्डीकर सप्रे