अमेरिकन मराठी

कहाणी अमेरिकन मराठी प्रवाहाच्या पन्नाशीची

कहाणी अमेरिकन मराठी प्रवाहाच्या  पनाशीची
अमेरिकन मराठी

कहाणी अमेरिकन मराठी प्रवाहाच्या पनाशीची

अमेरिकेतल्या मराठी माणसांचा गेल्या 40 -५० वर्षाचा आढावा घेऊन कोणी त्यावर पुस्तक लिहिलेले नाही. तसे पुस्तक लिहिणे हे ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही आवश्यक आहे. म्हणून मी आणि माझ्या नवऱ्याने (अशोक सप्रे) एकमताने ‘अमेरिकन मराठी: जन , मन, अधिवेशन’ हे पुस्तकच लिहिलं आणि ते अभ्यासू ,जिज्ञासू आणि अज्ञासू ( म्हणजे अभ्यासू ,जिज्ञासू असा आव आणणारे) अशा सर्व मराठी लोकाना अर्पण कराव, असं ठरवल.( हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनाने २०१५च्या मराठी अधिवेशनात प्रकाशित केले,याची सर्वसूनी नोंद घ्यावी.)

अमेरिकन मराठी

महाबलांची ‘तारांबळ’

काही  वर्षांपूर्वी मी एका छोट्या पाहुण्याला  घेऊन लॉस एंजेलिस मधील ग्रीफिथ ऑब्झर्वेटरी पहायला गेले होते.  त्याला त्याच्या आई बाबांनी लहान दुर्बीण भेट दिल्यामुळे त्याला ग्रह तारे याबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं. तिथे एक सुंदर म्युझियम आहे. त्यातील एका दीडशे फूट लांब  आणि वीस फूट उंच भिंतीसमोर आम्ही थबकलो.              त्या  अख्या भिंतीवर एक म्युरल आहे. READ MORE

अमेरिकन मराठी

मेवाती मेवा.

भारतीय शास्त्रीय संगीतात सूर, समय आणि मनात प्रकटणारे भाव यांचे एक तरल नाते आहे. ‘मेवाती ऑफरीन्ग्ज’ ही श्री. सुहास जोशी यांची सी.डी. ऐकताना ते  उलगडत जाते.     उष:काल होण्याआधीचे प्रसन्न पण धुक्यात वेढलेले वातावरण.. फुलांचा मंद दर्वळ आणि खलाटीतून येणाऱ्या धुक्याच्या लाटा… “भस्म माखिले दिसे चराचर” असं शिवरूप घेऊन कोमल रिषभ- च्या अवगुंठनातून हलकेच उमलणारा READ MORE