उत्तररंग

स्थलांतर करून अमेरिकेत आलेल्या सर्वच देशातल्या लोकाना  आयुष्याच्या पूर्वकाळाचा तसा  उत्तर काळाचाही वेगळा विचार करावा लागतो. आपण व्यक्ती म्हणून आणि स्थलांतरित समाज म्हणून  आपले  उत्तर आयुष्य सुखासमाधानात कसे  घालवू शकू याच्या मार्गदर्शनासाठी आणि  माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी असलेले व्यासपीठ किंवा मंच  म्हणजे उत्तररंग!

या संकल्पनेचे शिल्पकार डॉ. अशोक सप्रे. उत्तर अमेरिकेत या विषयाबद्दल जागृती निर्माण करण्याचे अविरत प्रयत्न आम्ही गेली तीस वर्षे करत आहोत. याबद्दल लेखन, विविध परिषदा, मेळावे आणि गप्पा ही आमची माध्यमे.   जागोजागी होणाऱ्या भारतीय उत्तररंग वसाहती, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात होणारी एक दिवसाची उत्तररंग परिषद आणि दोन हजार वीस पासून, महामारीच्या काळात महाजालावर झूम च्या माध्यमातून साकारणारा उत्तररंगाचा बहुरंगी आविष्कार ही आमच्या स्वप्नाची दृश्य रूपे !

यासाठी आम्ही जमवलेले साहित्य, माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा प्रयत्न आहे.  आम्ही लिहिलेले  या उत्तररंगाचे बोधवाक्य आहे :

एकमेकांचे धरुनी हात | सुखशान्तीची शोधू वाट ||

चला राहू आनंदात | आयुष्याच्या उत्तररंगात ||

यासाठी बोधचिन्ह तयार करून दिले आहे लॉस एंजेलिसच्या शीतल रांगणेकरने. तिला आणि उत्तररंगाचा आमचा वारसा नेटाने पुढे नेणाऱ्या अनेक स्वयंसेवकांना मन:पूर्वक धन्यवाद. 

विद्या हर्डीकर सप्रे 


उत्तररंग

वेध उत्तररंगाचे

विद्या हर्डीकर सप्रे टीप: २०१५ पासून बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात उत्तर रंग ही एक दिवसाची परिषद होत असते. त्याचे बोधवाक्य READ MORE